Sunday 19 March 2023

नवरत्न सरबत

पिंपल्स, मूतखडा, गॅस, उष्मादाह, आणि अशक्तपणा याचा उपाय.





उन्हाळा  म्हटलं की आठवते ती उन्हाळ्याची तयारी. उन्हाळा म्हटलं की आठवतात थंडगार सरबत, उन्हाळकाम, पापड, सालपापड्या, आणि बरंच काही. उन्हाळा म्हटलं की आठवतो आंब्याचा मोहर, चिंच , कैरी या आणि अशाच अनेक उन्हाळ्यातील चटपटीत गोष्टी.

पण उन्हाळ्याच्या तयारीमध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो का? 
त्याचवेळी आपण आपले आरोग्य लक्षात ठेवतो का? उन्हाळ्याच्या नवीन नवीन गोष्टी आपण बनवतो मात्र अनेकदा नवीन नवीन त्रास देखील आपल्याला अनुभवायला भेटतात. 
उन्हाळ्यात आपण कितीही पाणी प्यायलो तरीही शरीराला येणाऱ्या घामामुळे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता नियमित राहते; अशात शरीराला थंड ठेवणे गरजेचे असते; असे न केल्यास अनेकदा उष्माघात, लघवीला जळजळ, मूळव्याध, अशक्तपणा , डोकेदुखी , चक्कर, असे अनेक प्रकार होत असतात. 
मग अशा वेळी दवाखान्याला पैसे घालवण्यापेक्षा असा घरगुती उपाय आहे की ज्यामुळे आपण अनेक त्रासापासून वाचू शकतो. 

यासाठी आपल्याला फार काही नाही करायचे, त्यासाठी अगदी घरातील रोजच्या वापरातील वस्तू सहज मिळून जातील, त्याच वस्तूंनी आपण याचा उपाय शोधणार आहोत. 
उन्हाळ्यामध्ये आपण अनेकदा कैरीचे पंन्हे, लिंबू सरबत किंवा कोकम अशी  पेये पीत असतो, परंतु अनेकदा आपल्याला ही पेये  बनवण्याचा खूप कंटाळा येतो आणि त्यामुळे आपण बाहेर दुकानातील तयार असलेली पेये पितो जी शरीरासाठी हानिकारक असतात. 
मग अशा वेळेस रोजरोज सरबत बनवण्याचा जर कंटाळा येत असेल तर ही झटपट रेसेपी फक्त तुमच्यासाठी आणि ही रेसेपी फक्त झटपटचं नाहीये तर याचा तुम्हाला खूप शारीररक फायदा सुद्ध आहे. 
अपचन, गॅस, मूतखडा, अशा आजारांवर देखील हा रामबाण  उपाय आहे. लहान मुलांना देखील हा सरबत फार आवडतो.
 याचे नाव आहे नवरत्न सरबत. जसे याचे नाव आहे तसेच यामध्ये आपल्याला नवरत्न घालायचे आहेत.

  • सामग्री खालील प्रमाणे 
  1. दोन बीट. 
  2. पावशेर मोठा आवळा. 
  3. तीन कैरी. 
  4. काळे मीठ. 
  5. सुंठ. 
  6. एक चमचा जीरे. 
  7. तीन चमचे धने. 
  8. पाच चमचे खडीसाखर. 
  9. पाणी 
 


कृती:   सर्वप्रथम दोन बीट, एक पावशेर आवळा आणि कैरी खिसणीने  वेगळे वेगळे खिसुन घ्यावे. हा खीस वेगळ्या वेगळ्या ताटामध्ये ठेवून कडक उन्हामध्ये वाळवायला ठेवा. वाळवताना यामध्ये थोडेसे काळे मीठ बारीक करून चवीपुरते घालावे. खीस वाळवुन चांगला कडक झाला पाहिजे यासाठी तुम्हाला 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवू शकता. 






आता एका मिक्सर भांड्यामध्ये एक चमचा काळे मीठ, थोडीशी सुंठ, दोन चमचे जीरे, तीन चमचे धने, पाच चमचे खडीसाखर हे सवव एकत्र बारीक दळून घ्यावे. आता तुमचे तीन प्रकारचे खीस आणि बारीक दळलेला मसाला तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हीं पाण्यामध्ये घालून त्याचा सरबत करून पिऊ शकता. 
तुम्हाला हवे असल्यास प्रत्येक मिश्रण तुम्ही वेगळ्या वेगळ्या हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये बंद करून ठेवू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास सर्व काही एकत्र करून एकाच हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये ठेवू शकता, परंतु मीठ व साखरेमुळे मिश्रणाला पाणी सुटण्याची शक्यता असते; त्यामुळे शक्यतो चार वेगवेगळ्या हवाबंद डब्यामध्ये आपण  ही सामग्री ठेवावी. 



जेव्हा उन्हातून याल किंवा तहान लागेल त्या वेळी एक ग्लास पाण्यामध्ये चारही डब्यातून अर्धा  चमचा किंवा एक चमचा गरजेप्रमाणे सामग्री टाकून किंवा ज्याची चव जास्त आवडते ती सामग्री जास्त टाकून तुम्ही हा सरबत प्रत्येक वेळी नवीन पद्धतीने बनवू शकता. 


No comments:

Post a Comment

गुडीपाडवा महत्व आणि Gudi Paadwa Trending look

 गुडी पाडवा म्हणलं कि आनंद सोहळा. महाराष्ट्राच्या पारंपरिक सणांमध्ये या सणाला एक विशेष महत्व आहे. हा सण  हिंदू  शुद्ध प्रथमी रोजी साजरा के...