Tuesday 21 March 2023

गुडीपाडवा महत्व आणि Gudi Paadwa Trending look

 गुडी पाडवा म्हणलं कि आनंद सोहळा. महाराष्ट्राच्या पारंपरिक सणांमध्ये या सणाला एक विशेष महत्व आहे. हा सण  हिंदू  शुद्ध प्रथमी रोजी साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र उत्साहात असतो. हा सण दोन मुख्य कारणांसाठी महत्वाचा आहे; पहिलं कारण असं मानलं जातं की हा सण हिंदू नववर्षाची शुरूआत करतो आणि दुसऱ्या दृष्टीकोनातून हा सण विजयाचा दिवस मानला जातो. 


महाराष्ट्रातील विवध भागात विविध परंपरे नुसार या दिवशी ची वेशभूषा, खाद्यपदार्थ, रीती भाती या मध्ये थोड्या फार प्रमाणात फरक आपल्याला पाहायला मिळतो मात्र या दिवशी असलेले कडुलिंब, साखरेच्या घाट्या आणि गुडी याचे महत्व मात्र सगळीकडे सारखेच आहे. 




मोठ्या बांबूवर नववारी साड़ी, त्यावर लखाकणारा पितळेचा तांब्या किंवा कलश, कडुलिंब आणि  हलव्याचे दागिने  घालून सजवलेल्या सुंदर उंच गुड्या दारोदारी सजवल्या जातात. शहरी भागामध्ये जागेच्या अभावामुळे गुडी उभारणे हे मोठ्या प्रमाणात दसून येत नाही परंतु ग्रामीण भागा मध्ये गुडीपाडव्या दिवशी नयनरम्य  दृश्य संपूर्ण गावात असते. कोणाची गुडी जास्त उंच आहे? कोणाच्या गुडीची साडी छान आहे अशा चर्चा लहान मुलांमध्ये रंगतात. गावामध्ये तर अंगणात शेणाचा सडा, रांगोळ्या, पुरणपोळी, मंदिरात गर्दी असे एकूण मंगलमय वातवरण असते. गुडी पाडवा साजरा करावा तर तो गावी जाऊनच!





गुडी पाडवा ह्या सणाची आवड हि फक्त महाराष्ट्र पुरतीच नाही तर संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची हि परंपरा लोकांना आवडते. अशात मराठी सिनेमा सृष्टी व बॉलीवूड मध्ये देखील आपल्याला या परंपरेची छाप आणि आवड दिसून येते. या दिवशी शहरातील असो किंवा गावातील सर्वच  स्त्री, पुरुष, लहान मुले पारंपरिक  वेशभूषा करतात. मग अशात आपण एखादी आपल्या आवडत्या मालिकेतील किंवा अभिनेत्री ने केलेली वेशभूषा आणि केशभूषा नक्कीच करावी असं प्रत्येकीला वाटत. 



कसा असावा गुडी पाडव्याचा नवीन लुक.. ? 

आज आपण पाहणार आहोत ५ फेमस आणि ट्रेंडीं लुक आणि जो लुक तुम्हाला आवडेल त्या फोटोवर  क्लिक करा आणि या लुक चा आंनद घ्या. 





१. पेशवाई किंवा काशीबाई लुक -  



आता हा लुक फक्त महाराष्ट्र पुरताच मर्यादित राहिला नाही पुण्याचा सुप्रसिद्ध पेशवाई लुक आता संपूर्ण जगभरात बॉलीवूड  मुळे ओळखला जातो. प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिहं यांनी केलेल्या वेशभूषेला आता चांगलाच ट्रेंड आलाय. 





२. सावित्रीबाई लुक - 



हा लुक देखी तान्हाजी चित्रपटा मध्ये काजोल या अभिनेत्री ने केल्यामुळे मराठी वेशभूषेला जगातीक दर्जा मिळाला. हा लुक खूप साधा आणि सुंदर आहे. अजय देवगण आणि काजोल ची हि वेशभूषा मध्यमवयातील स्त्रियांना सुद्धा फार शोभून दिसते. 






३. ताराराणी लुक -  



महाराष्ट्राची अस्मिता जपणारा ताराराणी लुक हा फारच चर्चेत आहे ते ताराराणी यांच्या महान व्यक्तिमत्वामुळे. अनेक चित्रपटातून आपल्याला ताराराणी यांची भूमिका पाहायला मिळते . हा लुक राजघराण्यातील असल्या मुळे महिलांना  हि वेशभूषा फार आवडते. 









४. पैठणी चुडीदार-  



सणाच्या दिवशी असलेल्या कामाच्या गडबडीत शहरातील स्त्रियांना बहुतेक वेळा तयार होण्याचा वेळ भेटत नाही अशात एखादा सुंदर मराठमोळा चुडीदार व त्यावर सुंदर दागिने हे देखील महिलांच्या आवडीचा विषय आहे असेच काही खाली लुक. 




५. मायरा  / परी लुक - 


माझ्या तुज्या रेशीमगाठी या सिरीयल मधली गोड मायरा चांगलीच चर्चेत आहे. अशात तीचे सोशल मेडीय वर वायरल होणारे फोटो आणि विडिओ मधले तिचे लुक लोकांना फारच आवडतात. तुमच्या घरातील लहान मुलींसाटगी देखील तुम्ही तिचे लुक करू शकता. 




Sunday 19 March 2023

नवरत्न सरबत

पिंपल्स, मूतखडा, गॅस, उष्मादाह, आणि अशक्तपणा याचा उपाय.





उन्हाळा  म्हटलं की आठवते ती उन्हाळ्याची तयारी. उन्हाळा म्हटलं की आठवतात थंडगार सरबत, उन्हाळकाम, पापड, सालपापड्या, आणि बरंच काही. उन्हाळा म्हटलं की आठवतो आंब्याचा मोहर, चिंच , कैरी या आणि अशाच अनेक उन्हाळ्यातील चटपटीत गोष्टी.

गुडीपाडवा महत्व आणि Gudi Paadwa Trending look

 गुडी पाडवा म्हणलं कि आनंद सोहळा. महाराष्ट्राच्या पारंपरिक सणांमध्ये या सणाला एक विशेष महत्व आहे. हा सण  हिंदू  शुद्ध प्रथमी रोजी साजरा के...